STORYMIRROR

Stifan Khawdiya

Others

3  

Stifan Khawdiya

Others

नवा संकल्प

नवा संकल्प

1 min
115


गत काळाशी नको सामना

मानवा वर्तमान जगतांना

एक प्रयत्न स्वत:साठी

जीवन वाट चालतांना

जीवन आशीर्वाद,जगणे लाभ

मानवा तू किती भाग्यवंत

बदल तुझ्यात,घडेल जीवन

मानवा तू होशील यशवंत

नको करु हेळसांड जीवनात  

आज घडव तू स्वताला

ठसा तुझा,शिकवण स्वावलंबी

ओळख न्यारी तुझी जगाला

योग्य दिशेला वाटचाल सदैव

अर्थ खरा तुझ्या जगण्याला 

सुविचारांची पदोपदी संगत

आदर्श शोभेल तुझ्या वागण्याला

रोज घडामोडी नवीन जीवनात

दोर तुझ्या आयुष्याची बळकट

दिवस उगवतो दिवस मावळतो

जीवनात भर तू प्रगतीचा मळवट

नाही थांबत वेळ कोणासाठी

क्रिया दैनंदिन जीवन मार्गावर

घे सार्थक करुणी जीवन आपले

धावतो काळ असाच निरंतर

जरि सरला काळ रिक्त तसाच

तरि नको निराश होऊ जीवनात

वेळ पुन्हा आली सावरण्याची

नवे वर्ष नवा संकल्प जीवनात

कर प्रयत्न बिध्दास्त मानवा

नको चुकवू जगण्याचा सुंदर मोका

जुने ते सोडूणी नवे ते स्वीकार

घे जीवनाचा आता उंच झोका


विषय का मूल्यांकन करें
लॉग इन