माझा गुरु
माझा गुरु
1 min
136
गुरु माझा हितकारी
आदर्शतेचा कळस भारी...
शब्दांचा आहे कुबेर
ज्ञानाची ज्योत न्यारी..
न गर्व कधी कसला
मदतीचा हात पहिला...
शिल्पकार परिवर्तनाचा
परिस लाभला मानवतेला...
उद्धार मानवतेचा सदा
देतो शब्दांत मंत्र जगण्याचा...
वसा हाती जनजागृतीचा
यशाचा मार्ग सुखाचा...
करितो वंदन गुरूस माझ्या
संदेश त्याचा आचरणात सदा
घडो पदोपदी सहवास त्याचा
जीवन माझे सर्वगुण संपन्न सर्वदा
