कुटुंब
कुटुंब
माय बापाच्या सहवासात
कुटूंब माझं आशिर्वादित
न्यार कसं घराला घरपण
माझ्या गोजिरवाण्या कुटूंबात
नात्यांच्या बंधनाच झालं गुंफन
गुंफन कुटुंबाचं घर अंगणात
मानुसकि वावरते पदोपदी
माझ्या गोजिरवाण्या कुटूंबात
जशी उन्हात थंड सावली
तसा कुटुंब सदस्य एकित
आपुलकिचा ठेवा प्रबळ
माझ्या गोजिरवाण्या कुटूंबात
होतो सुख दुःखांचा सामना
सदा एकमेकांच्या विचारात
सुख शांती समाधान नांदत
माझ्या गोजिरवाण्या कुटूंबात
कधी रुसवा कधी गोडवा
कधी मौन ठकवा आपापसात
नसे तंटेला धारा शाब्दिक कधी
माझ्या गोजिरवाण्या कुटूंबात
घराण्यात घराणे भाग्यशाली
गणणा कुटुंबाची मानुसकित
देवा तुझा कृपाप्रसाद सदासर्वदा
माझ्या गोजिरवाण्या कुटूंबात
