परी
परी


गुलाब फुलांचा झगा सुंदर
वरी चांदण्यांची खडी
हिरव्यागार मखमाली वरती
नाचत होती एक परी.......
क्षणात घेतली गगन भरारी
सरसरली उंच गिरी
वाराही रोमांचीत झाला
त्यास भरली शिरशिरी
पक्षांची कलाहट थांबली
सूरं दाटले त्यांचे उरी
घिरट्या घेत पतंग उडाला
सुंघीत एैशी कस्तुरी
मेघांनी काजळ ल्याले
वाजवू लागले गोड बासुरी
मावळतीचा सूर्य हरकला
क्षितिज पांघरे स्वर्ण जरी
आकाशाला चढली खुमारी
बघूनी देखणी स्वर्ग परी
भाळी तिच्या चंद्र बैसला
अविट अशी तिची माधुरी