STORYMIRROR

Aasavari Ainapure

Abstract Classics

3  

Aasavari Ainapure

Abstract Classics

विठ्ठलाच्या दारी

विठ्ठलाच्या दारी

1 min
112

विठ्ठलाच्या दारी

आली आज वारी

जाहले भक्तीत दंग

वारकरी |


भाव हा भक्तीचा

दिसे ठायी ठायी

वसे तो विठ्ठल

अंतर्यामी |


गळाभेट घेण्या

उत्सुक जाहले

भक्तीत नाहले

पंढरपूर |


विठू माझा सखा

विठू माझी माय

अनाथांचा नाथ

तो हा विठ्ठल |


सावळे हे रूप

वर्णावे ते काय

करकटावरी उभे

अवघे विश्व |


जप माउलींचा

चाले रात्रंदिवस

नाद टाळ-मृदुंगाचा

घुमे आज |


नामाचा जयघोष

अभंगांचा गोडवा

अश्व रिंगणाने

सजे वारी |


वारीचा हा सोहळा

एकदा अनुभवावा

चित्ती वसू द्यावा

फक्त विठ्ठल |



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract