आठवण
आठवण
1 min
15.8K
पानांची सळसळ ऎकल्यावर
मनात तरंग उठतात,
आणि तुझी आठवण आल्यावर
कागदावर शब्द उमटतात,
तुझी नुसती आठवण झाली
तरी शब्द धावत येतात,
मनातल्या माझ्या भावनांना
कवितेचं रूप देऊन जातात,
मनातल्या गाभाऱ्यात फुलते रातराणी
आल्यावर तुझ्या गोड आठवणी,
आठवण तुझी आल्यावर
काय सांगू काय होते,
इंद्रधनुष्याच्या रंगासारखे मन बहरून जाते,
आणि तुझ्या आठवणींच्या पावसात
मन चिंब भिजून जाते,
मन चिंब भिजून जाते ..........