STORYMIRROR

Surekha Wani

Others

3  

Surekha Wani

Others

दिवाळी आली

दिवाळी आली

1 min
320

 दिवाळी आली ,दिवाळी आली ,   

 लक्ष लक्ष दिप उजळीत दारी,   

 अंतर्मनाला तेजस्वी करित...  

 सुख ,समृद्धी आनंदाची उधळण करित...  

 दिवाळी आली,दिवाळी आली....  

 अंगणात शोभे सुबक रांगोळी,  

 व दिव्यांची सुंदर आरास...   

 आकाश कंदील आणि पणत्यांची  शोभा....

 सोबत स्वादिष्ट फराळाची लज्जत,    

 परस्पर स्नेहाची वृद्धी करीत,   

 नव चैतन्याची पहाट घेऊनी,   

 दिवाळी आली, दिवाळी आली....  

 'वसु बारस' ते 'भाऊबीज' 

सहा दिवसांचा सण मोठा....   

आनंदाला सर्वांच्या नाही तोटा,   

 बाळ मंडळी मग्न,

 उडविण्यात फुलबाज्या अनार....   

 नव नव्या कपड्यांचा आनंद फार,  

 प्रकाशाचे पर्व घेऊनी,  

 दिवाळी आली, दिवाळी आली....   

 चला करू या दिवाळीत,   

 दिन, दुबळ्यांना सहाय्य,   

 करू या त्यांची दिवाळी तेजोमय,   

 आणू या स्मित त्यांच्या चेहऱ्यावर,   

 आपली ही दिवाळी होईल सुंदर,   

  दिवाळीआली, दिवाळी आली....


Rate this content
Log in