कसं करू रे तुझ्याशी लग्न ?
कसं करू रे तुझ्याशी लग्न ?
तुला ना नोकरी, ना रोजगार ,ना घर- दार ...
तुझंही ठरलेलंच सारं काही ..पक्क .
पाठीवर जसं विंचवाच बि-हाड
विघ्नच - विघ्नं कसं करू रे तुझ्याशी लग्न ?
तू वसवतोस फक्त स्वप्नांचाच गाव
कृतीशिवाय स्वप्नाना अर्थच नसतो ना यार
सांगावं समजून तुला तर तेही पटत नाही तुला
तू स्वप्नवेडा,,, कसं करू रे तुझ्याशी लग्न ?
तू तुझ्या जगताच हरवलेला असतोस
वास्तवाचे तुला न उरले भान...
सोप्प नसत रे जीवन तुला जितकं वाटतं
आई- बाबाचा नकार कसं करू रे तुझ्याशी लग्न ?
माझा विश्वास आहे रे तुझ्यावर पण...
प्रेमासाठी मी नाही देऊ शकत बळी त्यांचा
ना करू शकते आईबाबाचा विश्वासघात ,
मी हताश झाले रे..कसं करू रे तुझ्याशी लग्न ?
खूप वाटतं रे .. धावत येऊन मिठीत तुझ्या विसावं
धुमसून-धुमसून रडावं , होऊन जावं तुझं कायमचंच ...
स्त्री म्हणजे गुलामच, तिच्या मनाचा विचार कोण करणार
कुठल्याही खाटकाच्या दारात बांधलं तिथं जावं गप्पगुमान ...