STORYMIRROR

pooja thube

Children Stories Others

4  

pooja thube

Children Stories Others

बंड्याचा प्रवास

बंड्याचा प्रवास

1 min
435

दिवाळीच्या सुट्टीत आजोबांचा निरोप आला 

बंड्याला आजोळी जाण्याचा योग आला 


आजोबा आले न्यायला 

बंड्या लागला नाचायला


कपडे, डबा नि फटाके केले पॅक

खुशीतच निघाली स्वारी घेऊन सॅक 


प्रवास होता रेल्वेचा 

पत्ता नव्हता बंड्याचा 


आजोबा शोधू लागले 

वडापाव घेऊन बंडोबा आले 


खिडकीजवळ मिळाली जागा

बंड्याचा ह्या थाट बघा


झुकझुक रेल्वे धावू लागली जोरात 

बंड्याही मग आला तोऱ्यात


पळणारी झाडे नि उडणारे पक्षी

बंड्याच्या प्रवासाला सारे होते साक्षी


खाऊ खात खात बंड्या खिडकीबाहेर पाही

आजोबांना भलतेच प्रश्न विचारी


आजोबा म्हणाले, "जीवनाच्या प्रवासात कधी दमू नकोस

त्या प्रवासाचा आनंद गमावू नकोस"


"आयुष्याचा प्रवास कसाही असावा

त्यात वाईट कृत्याचा डाग नसावा"


बंडोबाने होकार दिले

तेवढ्यात आपले गाव आले 


गावी केली धमाल नि बंड्या निघाला 

त्याला जीवनाचा प्रवास कळाला



Rate this content
Log in