STORYMIRROR

pooja thube

Children Stories Comedy Others

3  

pooja thube

Children Stories Comedy Others

फजिती राजाची

फजिती राजाची

1 min
197

एक आटपाट नगर

नाव त्याचे आनंदपूर

आनंद तिथे ओसंडून वाहे

नि सोन्याचा निघे धूर


आनंदपूरचा राजा आनंदसेन

होता मोठा मजेशीर

भरभराट होती खजिन्याची

पण राजा नव्हता शिस्तशीर


सूर्य डोक्यावर येईपर्यंत

राजा झोपून राही

भराभर आदेश देऊन

नोकरांची धावपळ पाही


राजाच्या जेवणाचा 

होता भलताच थाट

चांदीच्या ताटात असे रोज

पंचपक्वानांचा घाट


राजा मग निघे

मारायला राज्यात फेरफटका

प्रधानजी मग

विसावत दोन घटका


राजाला येताना पाहून

प्रजेची धांदल उडे

राजा जनतेला देई

उपदेशाचे धडे


एकदा दुपारी

राजा निघाला फिरायला

स्वारी होती खुशीत

सारी भरभराट पाहायला


राजाचा घोडा

पांढराशुभ्र छान

वेग त्याचा वीजेसारखा

राजाला वाटे अभिमान


रामू शेतकरी येत होता

शेतातून गवत घेऊन

पाहताच ते लुसलुशीत गवत

घोडा गेला उधळून


घोड्याचे ते रूप पाहून

रामू खूप घाबरला

गवताची मोळी घेऊन

पळतच तो सुटला


राजाला उडवून लावत

घोडा पळू लागला

चिखलात पडून राजाचा

भलताच अपमान झाला


रामू पुढे नि घोडा मागे

घोड्यामागे पळे राजा

आगळीच ही वरात पाहून

खो खो हसत होती प्रजा


पुढून येणाऱ्या सैनिकांना

सारा प्रकार कळला

पळत जाऊन त्यांनी 

आधी रामूला पकडला


गवताची मोळी घोड्यापुढे टाकली

घोडा झाला शांत

चिखलाने माखलेला राजा पाहून

साऱ्यांनाच पडली भ्रांत


झाला प्रकार पसरला

वाऱ्याच्या वेगाने

राजाने रोजचे फिरणे

बंद केले रागाने


अति आत्मविश्वास

राजाला भोवला

एकटेच फिरण्याचा मोह

त्याने आता आवरला


प्रजेने सोडला

सुटकेचा निःश्वास

परंतु लाडक्या राजावर

होता त्यांचा विश्वास


राजाही आता 

वागू लागला जबाबदारीने

प्रजेची कामे

करू लागला आनंदाने


राजाने आपल्या वागण्याने

सर्वांना खूश केले

असे हे आनंदपूर

आणखी आनंदी झाले


ଏହି ବିଷୟବସ୍ତୁକୁ ମୂଲ୍ୟାଙ୍କନ କରନ୍ତୁ
ଲଗ୍ ଇନ୍