STORYMIRROR

pooja thube

Others

4  

pooja thube

Others

देशकार्य

देशकार्य

1 min
284

देश हा विविधरंगी

अनेक रंगांनी नटलेला

सुंदर राकट कणखर

उज्ज्वल भविष्य असलेला


उठा तरुणांनो 

जागे व्हा

देश घडविण्याचे कार्य

तुमच्या हाती घ्या


पहा सैनिकांनी किती

प्राण त्यागले

स्वातंत्र्य जे मिळाले

त्यांनी रक्त सांडले


शेतकरी राबती

रोज शेतामध्ये 

जाती दोन घास

तेव्हा पोटामध्ये 


चला मिळुनी सोबत

देशकार्य घेऊ हाती

देशाभिमान हा वाढे

सारे देश पाहती 


साहित्याला गुण द्या
लॉग इन