STORYMIRROR

pooja thube

Others

4  

pooja thube

Others

सैनिक

सैनिक

1 min
401

सुंदर सोज्वळ

निरागस ही बालके

भविष्य ही

उद्याच्या भारताचे 


मिळवण्या स्वातंत्र्य

प्राण हे सोडले

सैनिकांनी आपल्या

रक्त ही सांडले


उंच तो हिमालय 

खाली झुकला

त्याग हा पाहून 

तोदेखील रडला


आठवण या वीरांची

कधी नका विसरू 

झालात कितीही मोठे

त्यांना नका दूर करू


पहारा त्यांचा 

रात्रंदिनी असतो

तेव्हा कुठे आपण

शांतपणे झोपतो


ऊन असो वा

पाऊस-वारा

कुडकुडत थंडीमध्ये

ते घालतात येरझारा 


सलाम करा 

त्यांच्या त्यागाला

सलाम असो 

त्यांच्या ध्येयाला


लक्षात ठेवा त्यांना

ते आहेत म्हणून आहोत आपण

देशाची घ्या काळजी 

ते करतात सर्वस्व अर्पण 


साहित्याला गुण द्या
लॉग इन