STORYMIRROR

pooja thube

Others

3  

pooja thube

Others

लढा कोरोनाशी

लढा कोरोनाशी

1 min
256

बघ मानवा काय झाले

कोरोनाचे नवे संकट आले


मरु लागली माणसे

हरू लागली माणसे 

अदृश्य ह्या विषाणू पुढे  

हतबल झाली माणसे 


अरे प्रगत मानवा 

आता काय झाले

मोठेपणाच्या बढाया साऱ्या

सारे खोटे ठरले


घरात बंदिस्त माणसे सारी

स्वच्छंद फिरती पक्षी

प्राणीही घेती श्वास मोकळा

आहे सारे साक्षी 


प्रदूषण झाले कमी

कमी झाले गुन्हेही

जीव भांड्यात पडला

बिचाऱ्या पृथ्वीचाही 


शाप असला विषाणू हा

तरी भासे वरदान

सुधारू लागली माणसे

हसू लागले घरदार


एकट्या माणसाची नव्हे पृथ्वी

नाही आपण निर्बुद्ध 

आता येऊया एकत्र 

नि जिंकू हे युद्ध


Rate this content
Log in