STORYMIRROR

pooja thube

Others

4  

pooja thube

Others

सण उत्सव

सण उत्सव

1 min
556

सण समारंभ 

हातात हात घालून उभे

भारत देश साजिरा

उत्सवांचा देश शोभे


पतंग उडवत येई

मकरसंक्रांत ही

तिळगुळ घेऊन

'गोड बोला' संदेश देई 


प्रजासत्ताक दिनाचे

महत्त्व फार आहे 

प्रजेच्या सत्तेसाठी

सर्वकाही आहे 


रंगांमध्ये न्हाहून निघे

होळी ही लाडकी

झाले गेले विसरून जा

चाल हिची दुडकी 


गुडीपाडव्याचा सण

मोठ्या आनंदाचा 

सण हा आहे 

प्रतीक विजयाचा 


रक्षाबंधन सांगे 

बंधन प्रेमाचे

बंध हे नाजूक 

बहीण भावाचे 


स्वातंत्र्यदिन हा

असे थोर

मिळवण्या स्वातंत्र्य

युद्ध झाले घनघोर


रमजान ईद ही

होई आनंदाने साजरे

सारे आपण एक

संदेश हा द्या रे


दिवाळीचा थाट

काय तो वर्णावा 

दिव्यांच्या प्रकाशाने

देश हा उजळावा 


नाताळची मज्जा

लहानथोर घेती

सारे एकत्र येऊन 

आनंद वाटती


अठरापगड जाती

धर्मही अनेक

साजरे करुनि सारे सण

आहोत आम्ही एक 


Rate this content
Log in