जागर देशभक्तीचा
जागर देशभक्तीचा
1 min
245
गंगा यमुना
खळखळ वाहती
वाहताना भारताचे
गुणगान गाती
स्थिर उभा हा ताजमहाल
साक्ष देई इतिहासाची
प्रेमाचे प्रतीक हे
आठवण देई त्यागाची
सह्याद्रीच्या कपारींतून
देशभक्तीचा नाद घुमे
सुरक्षित राहो भारत माझा
सैनिक हे उभे
अरबी समुद्र प्रचंड
पाहिलाय त्याने इतिहास
लाटा त्याच्या सांगती
राहू नका उदास
कन्याकुमारीचे टोक
काश्मीरला खुणावी
जुळून राहावा हा भारत
असेच ते सांगी
कण कण या भारतातील
आहे साक्षी महानतेचा
विश्वास ठेवा स्वतःवर
जागर करा देशभक्तीचा
