सलाम
सलाम
1 min
313
१५ ऑगस्ट १९४७, नाही फक्त तारीख ही
स्वातंत्र्य साकार झाले, या दिवशी
हजारो क्रांतिकारकांनी, त्यागले प्राण
ठरले तेच, या देशाची शान
पडले कितीही गट, झाले मतभेद
एकच ध्येय, स्वातंत्र्य राहो अभेद्य
स्वातंत्र्यासाठी खेळले ते, रक्ताची होळी
पडले धरतीवर, झेलून छातीवर गोळी
राखावा आपण, त्यांचा मान
नाही कुणी मोठे, नाही कुणी सान
विसरू नका, बलिदान त्यांचे
आहे खूप काही, त्यांच्याकडून शिकायचे
सलाम त्यांच्या धैर्याला, सलाम कर्तृत्वाला
करूया सलाम, आपल्या भारत देशाला
