STORYMIRROR

pooja thube

Others

4  

pooja thube

Others

भ्रष्टपणा

भ्रष्टपणा

1 min
453

देश कुठे चालला

केला का कधी विचार

देश कशात अडकला

बदला आपले आचार 


नागरिकच तर असतात

देशाची शान 

कसे होईल जर

त्यांनी विसरला मान


रस्त्यावर थुंकणे 

कसे आपल्यास जमते

घरात स्वतःच्या थुंका

बघा कसे वाटते


कचरा सगळा बाहेर

घर असावे स्वच्छ 

देश का होईना मग

खूप अस्वच्छ 


ऐतिहासिक स्थळे 

प्रेमवीर गाजवतात

पाहून ते शूरवीर आमचे 

मात्र हवालदिल होतात 


टेबलखालून पैसे दिले

तर काम लवकर होते 

प्रामाणिक कामाला

इथे निंदा मिळते 


भ्रष्ट आचार नि

भ्रष्ट विचार

आपल्या या वागण्यापुढे

देश झालाय लाचार


बदला स्वतःला

देशाकडे पहा 

अंधारात चालला भारत 

तुम्ही मात्र उजेडात राहा 


भारतचे गुणगान फक्त 

स्वातंत्र्यदिनालाच का

रोज वाटेल कौतुक

असा देश बनवा 



Rate this content
Log in