STORYMIRROR

pooja thube

Others

3  

pooja thube

Others

भारत हा खवय्या

भारत हा खवय्या

1 min
167

भारत देश विविध चवींचा 

भारत देश विविध पदार्थांचा 

उत्तर ते दक्षिण पूर्व ते पश्चिम 

अनेक स्वादांची असे रेलचेल

पंजाबचा सरसों का साग 

लस्सी नि पराठा असे खास

राजस्थानी थाळी भारी चविष्ट

पदार्थांना मिळे राजेशाही चव 

गुजराथी ढोकळा नि फाफडा

समोसाही वाटे आपला 

दही वडा खायला मध्य प्रदेशाला जाल

इंदोरच्या खाऊगल्लीत रमून जाल

महाराष्ट्राची स्वादिष्ट पुरणपोळी नि तूप

मिसळीचा झणका नि वडापावची लज्जत खूप 

कर्नाटकचा मैसूर पाक झक्कास

तोंडात टाकता वाटे खास

हैद्राबादी बिर्याणी आहे शाही 

चव तिची जिभेवर राही 

बंगालची मिठाई गोड गोड छान

आनंदप्रसंगी असे तिला मान 

मेघालयचा भात नि मांसाहारी पदार्थ

जेवणाला देती ते अर्थ 

इडली नि डोसा तामिळनाडूचा चविष्ट 

सांबर नि चटणीही स्वादिष्ट 

केरळची मच्छी खूप चवदार  

नारळाचे पदार्थ असे असरदार 

सारे पदार्थ असती बहारदार 

खवय्यांच्या पोटाला देती आधार 


Rate this content
Log in