Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

pooja thube

Children Stories Tragedy

3  

pooja thube

Children Stories Tragedy

व्यथा विद्यार्थ्यांची

व्यथा विद्यार्थ्यांची

1 min
256


शिक्षण व्यवस्थेचे घटक आम्ही 

व्यथा सांगतो मी विद्यार्थी 

सकाळी अर्धवट झोपेत उठावे 

गृहपाठ अपूर्ण हे लक्षात घ्यावे 

सगळीच मग धावपळ होई 

खाण्याचेही मग भान न राही 

कसाबसा गृहपाठ दप्तरात कोंबतो 

अर्धभरल्या पोटाने शाळेला पळतो

दप्तराचे ओझे तुम्ही काय जाणावे 

सगळेच विषय रोज न्यावे 

मधल्या सुट्टीचा तास अर्धाच 

जेवावे कि खेळावे कळेनाच

गणिताचे सर वर्गात येती

डोळ्यांसमोर सगळे आकडे नाचती 

घंटेचा आवाज धीर देई 

मराठीच्या बाईंचा प्रवेश होई

पद्याचे वाचन गद्यासारखे होई

इतिहासाच्या तासाला वीरश्री संचारे

शिवरायांच्या इतिहास सर्वांना आवडे

गणिताचे सर नजरेस पडती 

इतिहासाच्या तासात गणिते लढती 

खेळाचा तास शेवटचा 

खेळून तंदुरुस्त होण्याचा 

त्यात होई इंग्रजीचा मारा

खेळच मोडे मग सारा 

शिक्षकांनाही काय बोलावे 

वेळच अपुरा त्यांनी काय करावे 

सांगा आहे का ज्ञानाची गॅरंटी 

ऍडमिशनला द्यावी भरमसाठ फी

शाळा सुटता घरी जावे 

थकलेल्या पावलांनी ट्युशनला पळावे

बालके आम्ही भविष्य उज्ज्वल भारताचे 

मेहनतीने स्वप्न फुलवू उद्याचे 

आहेत साऱ्यांना आमच्याकडून अपेक्षा

आमच्याच वाट्याला का मग उपेक्षा 

खेळण्या बागडण्याचे दिवस जाती उडून 

रात्रंदिन पळण्यात जातो बुडून 

सांगा बरे काय करणार आम्ही छोटे

असे असता कसे करणार देशाला मोठे?

आई बाबाही वेळ न देती

सोशिअल मीडिया त्यांच्याही हाती 

गरज थोडी अभ्यासाची, करमणूक नि खेळाची

नाही गरज अवजड त्या अपेक्षांची 

समतोल जेव्हा साऱ्याचा साधला जाईल 

आनंदी आनंद मग होईल

घेऊ नका मनावर काही बोललो जर चुकून  

बदलत्या जगाचा मी विद्यार्थी वंदन करतो वाकून!


Rate this content
Log in