जपा नाजूक कळीला..
जपा नाजूक कळीला..


भल्या पहाटे.. खिडकीतून.. आज..
सहज नजर गेली.. तिच्यावर..
इवलीशी एक गोड कळी.. अवतरली..
बागेतील गुलाबावर..
पिवळाधमक रंग तिचा..
अन् नाजूक हिरवी मान..
गोबरे गोबरे गाल तिचे..
दिसत होती किती छान..
निरनिराळी वेली झाडे.. बहरली..
त्यांना खुप सारी सुंदर सुंदर फळे फुले..
त्यातच एकुलती एक.. नाजूक कळी पाहून..
आनंदाने ते सर्व डोलू लागले..
नाजूक सुंदर काया तिची..
सर्वांना लागला लळा..
वेली फुले अन् झाडे पाने..
यांना तिचा खूप जिव्हाळा..
फुलपाखरे रंगीत रंगीत..
करती खेळ तिच्या अवतीभोवती..
झाली सर्वांना अतिप्रिय ती..
सुखे सर्व गोंजारती..
मोठी मोठी पाने फुले..
करती कळीवर ममता माया..
पडू नये वाईट नजर.. तिच्यावर..
म्हणून धरती सारेजण छाया..
त्या झाडावरील पाना फुलांनी..
झाकला तिच्यावर पदर..
पदराआडून ती पाहे सर्वांना..
पण ना येई कोणाला नजर..
कळी आता पदराआडच..
खेळायची.. बागडायची..हसायची..
कधी कधी रुसायची.. बोलायची अन्
हळूवार वाऱ्यावर.. मस्त डोलायची..
पण एक दिवस.. बागेत..
उडत आला.. मोठा भुंगा.. अवचित..
पाहुनी काळा भुंगा तो..
वेली झाडे पडली सारी निपचित..
भ्रमण करीत तो भुंगा..
करी गोड फुलांचे मधु शोषण..
सोबत नाजूक.. फुल पाकळ्यांचे..
करीत होता तो भक्षण..
काळया नराधम भूंग्याची..
बघुन अशी.. आज आगळीक..
मोठ्या पाना-फुलांनी.. आज..
कळीला नाही दिली मोकळीक..
काळजी वाटून पाना फुलांना..
कळीस पदराखाली झाकली..
फिरला भुंगा अवतीभवती..
परंतु त्याला ती नाही दिसली..
तितक्यात झाला.. काल महिमा तेव्हां..
सुटला शिरजोर.. 'कली' चा वारा..
पातळ पडला.. पदर कळीला..
भोवला.. अवेळी.. मदनाचा वारा..
नजर पडताच कळीवर.. भुंग्याने..
क्षणात टिपले तिला अलगद..
एकदम होत्याचे नव्हते होऊन..
झाली.. कळीची.. तेथे फसगत..
फुल उमलण्या आधीच.. कळीला..
भुंग्याने केले भ्रष्ट
मारून डंख.. केली चिरफाड..
तिला क्षणात केले नष्ट..
दुःखी होऊन.. सारी.. झाडी वेली..
अन् पाने फुले..झाली सर्व स्तब्ध..
पाहून सारा कलीचा महिमा.. समोर..
झालो मी हि नि:शब्द..
करितो हा कवी.. विनंती तुम्हाला..
हात जोडून मोठ्या आदराने..
सांगा समजावून.. नाजूक कळीला..
तुमच्याही.. ही कविता प्रेमाने..
सुटलाय वारा.. आज.. बाहेर.. कलीचा..
भारी.. मोठ्या.. लई जोमाने..
नका पडू देऊ.. नजर वाईट.. तिच्यावर..
जपा.. तिला.. नजरेच्या पदराने..