Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

गंगाशिवकापुत्र Ganesh G Shivlad

Action Inspirational

4.0  

गंगाशिवकापुत्र Ganesh G Shivlad

Action Inspirational

मी भारतीय

मी भारतीय

1 min
219


थोर वीरांचा भारत आमचा,

कमजोर आम्हाला समजू नका.

मान वर करुन बघण्याची,

हिंमत पुन्हा तुम्ही करू नका.


भारत माझी माता आहे,

जयजयकार तिचा करणारच.

पण वाईट तिला बोलणाऱ्याला,

तिथंच आडवा पाडणारच.


कुठं अन् कसा घाव घालवा,

हे सारं आम्हाला समजतं.

शत्रूला हिमतीनं टक्कर देणं,

हे निश्चितच आम्हाला जमतं.


मर्द मावळा सह्याद्रीचा,

आमच्या रक्ता रक्तात आहे.

तसं छावा म्हणतात आम्हाला,

मात्र जात भारतीयच आहे.


भाऊ म्हणून जवळ आलात,

तर ताटात घेऊन जेऊ आम्ही.

पण भाई म्हणून घात केलात,

तर घरात घुसून मारू आम्ही.


असं नका समजू तुम्ही की,

भिऊन मी सारं हे बोलतो आहे.

अरे, शत्रूंचा ही आदर करणं,

ही भारतीयांची रीत आहे.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action