प्रयत्न
प्रयत्न
झाडूनेच साफ करावा लागतो,
झाडूमधनं पडलेला कचरा.
स्वतःच बाहेर काढावा लागतो,
मन - मेंदूत सडलेला कचरा.
मानवी मन आहे हो जगती,
कधी ना उलगडणारा पिंजरा,
पाणी टाकूनच शोधावं लागतं,
पाणी कोठनं होतयं निचरा.
वागलो जरी आपण किती चांगले,
उलट वळती वाकड्या त्या नजरा,
rgb(0, 0, 0);">म्हातारपण ते कळतं हो तेव्हांच,
होतोय जेंव्हा तो माणूस बोचरा.
गजरा माळूनच फुलवावा लागतो,
रुसलेली बायको अन् तिचा चेहरा,
प्रत्येकीलाच पाहिजे शालू अन्
पदरावरती मोर जरतारीचा नाचरा.
सोडलीच सारी लाज त्यांनी आता,
म्हणलं, आपणच व्हावं थोडं लाजरा,
गाढवालाही म्हणावं कधीकधी साहेब,
तुम्हीच की हो त्राता, या साऱ्या खेचरा.