जगाच्या पाठीवरी
जगाच्या पाठीवरी
झोपेतच मी फिरून येतो,
जगाच्या पाठीवरी,
स्वप्न माझे, मी मस्तमौला,
जगाच्या पाठीवरी.
स्वप्न माझे बांधले मी,
आज ते गाठीशी जरी,
सखे बघ तू, होईल पूर्ण,
एकदा ते कधीतरी.
पूर्ण होण्या साथ देशील,
देशील ना मजला खरी,
वाटते अन् आहे बाळगून,
भावना मम मनी उरी.
धुंद माझा श्वास अन् ,
बेधुंद भावना हृदयी धरी,
अरुंद नाही मार्ग येथे,
कधीही कोणी या घरी.
वास आहे हृदयी त्याचा,
ज्याच्या हाती बासरी,
एक आहे तोची खरा,
दिली ज्याने ही वैखरी.
जगी तोची एक त्राता,
देतो सर्वां तो भाकरी.
तोच करेल मदत खरी,
घेउनी जग पाठीवरी.
