जातो आम्ही वारीला
जातो आम्ही वारीला
जातो आम्ही वारीला… पंढरपुराला…
दर वरसाला हो… दर सालाला…
आषाढीला हो… कार्तिकीला…
माहेराला हो… माझे माहेराला…
माय बाप माझे तेथे विठ्ठल रुक्मिणी
वाहे चरणी चंद्रभागा भाग्याची भगिनी
माथा टेकवितो तेथे बंधू पुंडलिकाला
जातो आम्ही वारीला… पंढरपुराला…
झाले जरी दर्शन कळसाचे माझे डोळा
मनी झाला आनंद आला दाटूनी गळा
धूळ पायरीची मला होऊ होऊ दे विठ्ठला
जातो आम्ही वारीला… पंढरपुराला…
माथा ठेवला चरणी तुझिया पांडुरंगा
देह रंगला रंगला तुझ्या अबीरी रंगा
झाला एक जीव आत्मा भजनी दंगला
जातो आम्ही वारीला… पंढरपुराला…
भेट झाली गोड थोर साधु संतांची
भासे जणू गळाभेट जिवलग बंधूंची
होतो एकरूप सारा तो गोपाळ काला
जातो आम्ही वारीला… पंढरपुराला…
जातो आम्ही वारीला… पंढरपुराला…
दर वरसाला हो… दर सालाला…
आषाढीला हो… कार्तिकीला…
माहेराला हो… माझे माहेराला…
