स्वप्न सुंदर सुखाचे..!
स्वप्न सुंदर सुखाचे..!
स्वप्न सुंदर सुखाचे,
पडले काही क्षणांचे.
घडली भेट जेंव्हा,
कोडे सुटले मनांचे.
ओझे ते होईल कमी,
तार जुळता देहांची.
आता या कातरवेळी,
गाठ पडेल मनांची.
झाली गोड भेट तेथे,
दोन प्रेमळ जीवांची.
थोडी का होईना झाली,
दूर नाराजी मनांची.
खेळ चाले तो मनाचा,
जसा ऊन पावसाचा.
घडी घडीला ढळतो,
तो तोल मना मनाचा.
कास सोडावी जुन्याची,
आस धरावी नव्याची.
गेले सांगून पूर्वज,
जाण ठेवूया तयाची.
#गंगाशिवकपुत्र

