काळ...
काळ...
काळ देतो काळ नेतो,
काळच कधी काळाचा होतो.
काळ येतो काळ जातो,
काळ कधी काळजाला खातो.
काळ थांबवितो काळजाचा ठोका,
कधी देतो तो मोक्यावर मोका.
काळ भरभरून देतो जीवन,
कधी हिसकावूनही घेतो जेवण.
काळ असतो म्हणे हा बहिरा,
कधीच कोणाचे ऐकत नसतो.
पण तो नसतो बरंका आंधळा,
तो सर्वांनाच पहात असतो.
वाट काळोखी काळाची ही,
मी चालून भागून दमलो.
जाळ करतो हा काळ जीवनी,
त्यात मी पुरता पोळलो.
काळजातला काळोख अजून,
किती काळ काळोखात ठेवू,
तोच पाहतोय जणू माझ्या,
जीवनाचा काळ होऊ.
काळाच्या त्या काळोखाला,
आता मी मुळीच घाबरणार नाही.
त्याच्याशी दोन हात करायला,
आता मी मागे हटणार नाही.
#गंगाशिवकापुत्र
