माणूसपण
माणूसपण
दवबिंदू परि हे जीवन आपुले,
नित्य पाहिजे आपण जपले,
शांत नितळ मनासोबती,
माणूसपण ही पाहिजे जपले..!
आल्या संकटाशी जावे सामोरे,
फिरावे कधी ना पाठमोरे,
संयमाने तोंड देण्या तयासी,
शौर्यपण अंगी पाहिजे राखले.
जीवन हवे खळ खळ पाणी,
अवखळ नदी जशी गाई गाणी,
महाकाय विशाल सागरासवे,
लहानपण घेणे पाहिजे शिकले.
कोणीही यावे टिकली मारून जावे,
हे आता लागेल थांबवावे,
शेरास सव्वाशेर होण्यासाठीहो,
शहाणपण अंगी पाहिजे भिनले..!
#गंगाशिवकापुत्र
