ऋतू बरवा
ऋतू बरवा
दिवसामागून दिवस,
महिन्यामागून महिने,
वर्षमागून वर्षे,
सरत आहेत… सरासरा..!
कॅलेंडरचेही पाने,
बदलत आहेत भराभरा..!
तसे भरत आहेत
आयुष्याचे दिवस…भराभरा..!
जीवनाचा प्रवास,
तसाच काहीसा… जराजरा..!
आयुष्यातून,
एक एक क्षण सरत आहे,
घटिका भरते आहे,
कमी कमी होत आहे आयुष्य,
तिळा तिळाने सरत आहे आयुष्य…!
ऋतू मागून ऋतू,
येत आहेत, जात आहेत,
अनुभव देत आहेत,
काही चांगले, काही वाईट..!
आठवणी ठेवत आहेत मागे
काही गोड, काही कडवट..!
पण…
कमी कमी जरी होतोय,
एक एक दिवस आयुष्याचा,
तेथे वाढत जात आहे,
एक एक पान,
जीवनाच्या पुस्तिकेत,
अनुभवाचे आणि
भोगलेल्या ऋतूंचे..!
त्यात कोणाच्या नशिबी,
असेल उन्हाळा,
कोणासाठी पावसाळा तर
कोणाच्या भाग्यात हिवाळा ही..!
त्यामुळे जसा लाभेल तसा,
जगून घ्या प्रत्येक क्षण,
प्रत्येक ऋतू,
प्रत्येक घटिका,
एक एक दिवस,
महिना आणि वर्ष,
एकदम मजेत,
एकदम बिनधास्त..!
जीवनात अनुभवलेले
उन्हाळे, पावसाळे, हिवाळे,
समजून घ्या, उमजून घ्या,
आणि उपभोगा..!
पुढील आयुष्यातला प्रत्येक ऋतू,
असेल कदाचित,
ऋतू हिरवा.. ऋतू बरवा..!
#गंगाशिवकपुत्र
