STORYMIRROR

Santosh Uike

Classics

4  

Santosh Uike

Classics

भारतीय संस्कृती

भारतीय संस्कृती

1 min
3.9K

भारतीय संस्कृती ही

श्रद्धा धर्माचे मिश्रण..!

आहे म्हणून महान

माझ्या संस्कृतीचे प्राण..!!

        

सिंधू हडप्पा संस्कृती

आहे रचना महान..!

तिची गोडवी सांगती

सारे थोर नि लहान..!!


नृत्य संगीत उत्सव

राज्या राज्याचे वेगळे..!

भारतीय संस्कृतीचे

रूपे आहेत सगळे..!!


हिंदू, बौद्ध, जैन, शीख

सवे धर्मही इस्लाम..!

भारतीय करी सारे

तिरंग्यास ते सलाम..!!


मान द्यावा बुजूर्गास

गेले सांगून पूर्वज..!

जुनी शेकडो वर्षाची

जपे संस्कृतीही आज..!!

        

मानवीय जीवनाचे

चार पाडून आश्रम..!

वयोगट ठरवून

त्याचा लावलाही क्रम..!!


आई बाप म्हणजेच

देव असती पुत्राचे..!

आलो करीत पालन

याच जीवनसुत्राचे..!!

        

मोठा मान गुरूलाही

माझ्या संस्कृतीचा ठेवा..!

लीन होण्यास आज्ञेत

लागो सर्वांनाच हेवा..!!


पुरूषार्थ गाजविण्या

गुण वारसाला देती..!

पुर्वजांचे पराक्रम

बळ लढण्याचे देती..!!

        

जरी विविधता येथे

तरी एकता दिसते..!

फक्त देशाच्या नावाने

सर्वां ताकद वसते..!!


भारतीय संस्कृतीला

साक्षी आहे इतिहास..!

जगी स्थापत्यशैलीही

आहे इथलीच खास..!!

        

पर्यटक विदेशाचे

गूढ जाणण्यास येती..!

माझ्या संस्कृतीचे मूल्य

संगे घेऊनिया जाती..!!


शब्द पडती अपूरे

गाण्या संस्कृतीचे गीत..!

बुद्ध सांगती अहिंसा

मनी जागवावी प्रीत..!!

        

भारतीय संस्कृतीची

गोष्ट आहे अशी न्यारी..!

देशी विदेशी यांनाही

वाटे सर्वांना ती प्यारी..!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics