STORYMIRROR

Santosh Uike

Others

3  

Santosh Uike

Others

माय मराठी

माय मराठी

1 min
159

महाराष्ट्राची माय मराठी, आहे आमुची शान..

जयजयकार गाता तिचे, उंचावते आमुची मान..!


ज्ञानियाच्या ज्ञानेश्वरीत, खुलतो तिचा श्रृंगार..

शिवबाच्या वाणीतून प्रकटता, मुघल झाले ते गार..

तुक्याच्या लेखनीतून उतरून, गायली विठ्ठलाचे गुणगाण..!


मराठीतून शाहू अवतरला, तसाच ज्योतिबा फुले..

सावित्रीही माय मराठीची, लेक म्हणूनी खुले..

गोरगरीबांना शिक्षणाचे, दिले मराठीतून दान..!


टिळक,गोखले,वीर सावरकर, लढा दिला मुक्तीसाठी..

मराठीचे निशाण फडकविले, वार झेलूनी छाती

'सागरा प्राण तळमळला..', गाता आठवतो अंदमान..!


कुसूमाग्रज, खांडेकरांच्या, प्रतिभेतून ती अवतरली..

केशवसूत अन् अत्रेंच्या, साहित्यात अमर ठरली..

साने गुरूजींची 'श्यामची आई', आम्हा देई संस्काराचे ज्ञान..!


सह्याद्रीच्या कडेकपारी, दुमदुमली पुन्हा एकवार..

कृष्णा, कोयना, गोदावरीची, महीमा गाते धार..

मराठी मायेचे पुत्र जाहलो, आहे आम्हा अभिमान..!



Rate this content
Log in