STORYMIRROR

Deepa Vankudre

Romance Classics

4  

Deepa Vankudre

Romance Classics

राधे कृष्ण

राधे कृष्ण

1 min
532

राधा प्यारी, कृष्ण मुरारी 

धुंदली वाजवता तू बासरी

नील वदन समीप येता 

अधर उमलवते ती सुंदरी 


गुपीत मनीचे काय सांगते 

एकरुप होऊन ती ललना

कान्हा जिथे, राधा तिथे,

भक्ती प्रेमाच्या आर्त भावना


पाव्याचे ऐकून सप्तसूर 

लयास गेल्या वेदना 

पावन झाली गात्रे सारी

तृप्त झाल्या संवेदना 


राधे राधे जपता खुलतो 

मार्ग तरण्याचा भवसागर

राधेकृष्ण एक विश्वस्वरूप 

अविरत प्रेमाचा जागर!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance