Deepa Vankudre

Others

3  

Deepa Vankudre

Others

सीता स्वयंवर

सीता स्वयंवर

1 min
209


भूमिकन्या सीतेचे स्वयंवर जेव्हा झाले, 

जनक राजाच्या नयनी अश्रू तेव्हा आले||धृ||


बालपणी खेळताना धनुष्य उचलले 

जनकाला दृश्य पाहून आश्चर्य वाटले 

दिव्य बालिका पाहून धन्य मन जाहले 

जनक राजाच्या नयनी अश्रू तेव्हा आले||१||


पण एक ठेवला सीता उपवर होता स्वयंवरासी 

प्रत्यंचा चढवावी, परशुराम शिवधनुष्यासी!

राजा महाराजांना त्यासाठी आमंत्रित केले,

जनक राजाच्या नयनी अश्रू तेव्हा आले||२||


ऋषी वशिष्ठांसवे श्रीराम- लक्ष्मण ही आले 

रावणासह कुणी धनुष्य ना उचलू शकले

गुरू आज्ञेने राघवाने पाऊल पुढे टाकले,

जनक राजाच्या नयनी अश्रू तेव्हा आले||३||


प्रत्यंचा चढवताना शिवधनुष्य असे मोडले 

अचंबित सारे लिला पाहून, कसे दिव्य घडले,

लज्जित मैथिलीने रामचंद्रास जेव्हा मग वरले

जनक राजाच्या नयनी अश्रू तेव्हा आले||४||


Rate this content
Log in