STORYMIRROR

Deepa Vankudre

Inspirational

3  

Deepa Vankudre

Inspirational

झुंज

झुंज

1 min
110

स्वैर मी, रानभैर मी,

मोकाट नाही, मुक्त मी,

आयुष्य हे रण नाही, 

ते तर जीवनगाणे,

धुंद तराणे!

पण स्त्री जन्मास 

सप्तरंगी कमान नाही, 

सोसण्याची बंधने!

का लज्जेचा अपमान, 

का गुणांचे तिच्या सीमित परिमाण,

का पायदळी तुडवता,

का ओज तिचे अव्हेरता?

दुर्गा म्हणून आरती करता 

आणि दासी म्हणून भोगता?

ही श्रुंखला तुटायला हवी,

काळी परंपरा सुटायला हवी!

माझी यशोगाथा मी गायला हवी,

झुंज माझ्या स्वातंत्र्याची....

बस! 

मी आता झुंजायला हवी!



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational