STORYMIRROR

Deepa Vankudre

Inspirational

3  

Deepa Vankudre

Inspirational

स्वतंत्र आकाश

स्वतंत्र आकाश

1 min
127

 तिचं स्वतंत्र अवकाश,

जिथे पंख पसरून,

झेप स्वच्छंद घेतली,

स्वैर भरारी मारून!


दिली नभाला पहाटे,

तिच्या अधरांची लाली,

उन्मलीत झाली काया,

किरणांचे सोने ल्याली!


रजनीला कशिद्यास, 

दिल्या तिने चांदण्या खूप 

कोर चंद्राची लावून,

खुलवले निशेचे रूप!


मेघांवर स्वार झाली

अनिलाने दूर नेली,

राज्य तिचे पाहण्यास,

क्षितिजाच्या पार गेली!


अशा स्वतःच्या जगात, 

स्वप्ने तिची पूर्ण होतात,

वास्तविकता मात्र वेगळी, 

तिथे तिला जगू न देतात!


उडायचा प्रयत्न केला की 

पंख तिचे छाटू पहातात,

मातृत्व आणि अंकुर,

दोन्हीची नाळ कापतात!


जननीच ती, जगण्याची,

आस कधी सोडली नाही,

अव्हेर, संभावना झेलून, 

जीवनाचा भार तोलू पाही!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational