"ती" च्या नजरेतून "तो
"ती" च्या नजरेतून "तो


वटवृक्षाच्या सावली सम तो...
लेक सासरी जाताना,
हळूच डोळे टिपतो, तिच्या नकळत,
हुंदका दाबत...
खोड्या काढल्या तरी,
राखीच्या रेशमी धाग्याचे भान असते त्याला!
झुरतो प्रेयसीसाठी! स्वप्नाळू डोळ्यांनी, तिला नक्षत्रांचा हार भेट देणार असतो!
जेव्हा ती हळूच कानात सांगते, ती सुखद बातमी...
तेव्हा तो थोडा भांबावतो,
थोडा लाजतो ही!
पण ठेंगणं झालेलं असतं आकाश!
त्याची पहिली हाक, "आई!"
तिच्या जीवनाची परिणती...
तिचा थरथरणारा हात स्वतःच्या
सुरकुतलेल्या हातात घेऊन धीर देतो...तिला...
हा हात सुटला तर? ही भीती दाबत...
तिच्या नजरेतून तो...
न्यारी रुपं घेऊन अवतरलेला,
पुरूष...!!