STORYMIRROR

Sanjay Pande

Abstract

3  

Sanjay Pande

Abstract

गाडगे महाराज

गाडगे महाराज

1 min
499

घेऊनी खराटा हाती!

गावागावात ते जाती!

किर्तनातूनी रंगती!

गाडगे महाराज!!१!!


शिक्षणाचा पुरस्कार!

किर्तनाद्वारे आकार!

जागोजागी साक्षात्कार!

दिधला या संतानी!!२!!


खराटयाने गावातली!

कीर्तनाने मनातली!

घाण साफसुफ़ केली!

या महान संतानी!!३!!


स्वच्छ करावे गावाने!

पुरस्कार शासनाने!

 सुरु करून नावाने!

गौरविले बाबांना!!४!!


अक्षर नाही शिकले!

तरी सर्व शिकविले!

शासनानेच दिधले!

नाव विद्यापीठास!!५!!


रूग्णाशी होतसे त्रास!

कुठेशी करावा वास!

सारला बाबानी त्रास!

बांधून धर्मशाळा!!६!!


सांगेल बकरी काप!

असे सर्वजणा ताप!

काय पूण्य काय पाप!

बाबांनी सांगितले!!७!!


ऎसा हा महान संत!

अमरावती ला अंत!

कार्यच असे अनंत!

नमन करितो मी!!८!!


संजय हा आज म्हणे!

आले गेले किती जणे!!

बाबांनी जोडली मने!

बोला बाबा की जय!!९!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract