STORYMIRROR

Sanjay Pande

Romance

3  

Sanjay Pande

Romance

प्रेम

प्रेम

1 min
219

तू माझ्या स्वप्नात

आली होतीस तेव्हा

सांग ना ग सखे

परत येणार केव्हा।।


गोड हसली होतीस

गालात तू तेव्हा

परत असे स्मित

देणार आहेस केव्हा।।


माझ्या अंगाशी तू

खेटली होती तेव्हा

परत अशी संधी

सखे मिळेल केव्हा।।


तुझ्या बोलक्या डोळ्यात

प्रेम पाहीले मीं तेव्हा

तूझ्या नजरेची कृपा

पडेल माझ्यावर केव्हा।।


तुझ्या गालावरची खळी

दिसली होती ग तेव्हा

परत असा सखे योग

येईल का सांग केव्हा।।


तुझे निरागस हास्य

टिपले होते ग तेव्हा

माझ्यासोबत हसायला

येशील ग परत केव्हा।।


सकाळी सकाळीच

पडले होते स्वप्न तेव्हा

सांग ना ग सखे ते

स्वप्न खरे होईल केव्हा।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance