STORYMIRROR

Sanjay Pande

Inspirational

3  

Sanjay Pande

Inspirational

भारत माझा देश आहे

भारत माझा देश आहे

1 min
621

भारतातील नागरिकांचे

मन आहे फार लहाण

तरी ही सारे म्हणतात

माझा भारत महान।।


भारत माझा देश आहे

म्हणण्याची वाटते लाज

माझेच भले कसे होईल

यातच गुंग आहे सारे आज।।


स्वच्छता ठेवण्यासाठी येथे

मोहीम राबवावी लागते

माझा भारत कचरा कुंडी

असल्यागत सारे वागते।।


अन्याय अत्याचाराने तर

गाठला आहे पार कळस

मला काय करायचे त्याचे

म्हणत करतात सारे आळस।।


माणूस माणसाशी आज

माणुसकीने कुठे वागतो

आपल्या स्वार्थासाठी मग

निचपणाचा कळस गाठतो।।


जेव्हा केव्हा सुरु होईल

या देशात माणुसकीचे पर्व

तेव्हाच माझा देश महान

म्हणताना साऱ्याना वाटेल गर्व।।



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational