STORYMIRROR

Sanjay Pande

Others

4  

Sanjay Pande

Others

पत्रकार दिन

पत्रकार दिन

1 min
689

जे जे दिसे अनुचीत

जेथे होतो अन्याय

पत्रकाराची लेखणी

देई अश्याना न्याय।।


असो भ्रष्टाचार वा

करो कुणी व्यभिचार

लेखणी चा वापर करती

जणू काही आहे तलवार।।


मांडती आपले विचार

निर्भिड अन रोखठोक

भले मग कोणाशीही

होवो यांची नोकझोक।।


भल्याभल्याना केले उघड

न बाळगता कोणाची तमा

किती ही येवो दड़पण

न करती कोणाला क्षमा।।


चोवीस तास करिती काम

बातमीचा करीत पिच्छा

पत्रकार दिनाच्या सर्वाना

मनापासून हार्दिक शुभेच्छा।।


Rate this content
Log in