STORYMIRROR

Sanjay Pande

Comedy Others

4  

Sanjay Pande

Comedy Others

समान काम

समान काम

1 min
1.3K

  

पन्नास पन्नास टक्के

ठरल होत ना रे आपले

मग तरी ही सख्या

तुझे डोके कसे रे तापले।।


लग्नाच्या वेळीच तर 

ठरले समसमान काम

आता का रे फुटतोय

तुझ्या कपाळावर घाम।।


भांडे मी घासायचे तर

तू मारणार होतास ना झाड़ू

ठरल्याप्रमाणे वागत नाहीस

म्हणून तर भांडण लागले वाढू।।


मी ही येते ना कामावरुन

थकून भागूनच सख्या घरी

कधी तरी विचारलेस का

आहेस का ग तू प्रिये बरी।।


जो प्रथम येईल घरी त्याने

ठरले होते ना द्यावा चहा

मी तर वागते ठरल्याप्रमाणे

तुझ्यातलाच बदल तू पहा।।


मूलांचे ही दोघांनी मिळून

करायचे होते ना रे ठरले

सांग कधीतरी तू मूलांचे

दफ्तर तरी खरोखर भरले।।


आता असा अचानक का

तुसडेपणाने माझ्याशी वागतोस

जेव्हा पाहिले तेव्हा माझ्यावर

जोरजोरात असा रागावतोस।।


मला ही आहे बर का

असा रागावण्याचा हक्क

मी ही रागावली तर मग

होऊ नकोस बर तू थक्क।।


एकाने केलेला पसारा 

दुसऱ्याने लगेच आवरायचा

हा साधा नियम संसारात 

असतो स्वीकारायचा।।


ठरल्याप्रमाणे वागलो तरच

संसारात वाढेल गोडी

मग बघ कशी ठरेल

आपली आदर्श जोडी।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Comedy