एक होती राणी
एक होती राणी
न संपणारी कविता
एक होती राणी
एक होती राणी
दिसायला देखणी
नित्य नेमाने सारखी
आरशात चाले पाहणी
पहिला दिवस उजाडला
उभी राहिली आरशासमोर
स्वयंपाक केला आणि
पुन्हा गेली आरशासमोर
सकाळी सकाळी लवकर
राणीने जेवण केले भरपूर
हात धुवून उठली आणि
पुन्हा गेली आरशासमोर
इकडून तिकडून आले की
राणीने आरशासमोर जावे
इकडून तिकडून आले की
राणीने आरशासमोर जावे
दुसरा दिवस उजाडला
पुन्हा गेल
ी आरशासमोर
तिसरा दिवस उजाडला
पुन्हा गेली आरशासमोर
चौथ्या दिवशीही तेच
पाचव्या दिवशीही तेच
सहाव्या दिवशीही तेच
आठव्या दिवशीही तेच
आला दिवस आरशासमोर
गेला दिवस आरशासमोर
सकाळ दुपार आरशासमोर
रात्रीसुद्धा की हो आरशासमोर
राजा म्हटला राणीसाहेब
आरसापुराण कधी संपणार
राणीसाहेब बोलली तावाने
दिसेपर्यंत आरशासमोर जाणार
टिप : कवितेतील पात्र, घटना, प्रसंग याचा वास्तविक घटनेशी कसलाही सबंध नाही. असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.