STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Comedy

1.0  

Abasaheb Mhaske

Comedy

तू फक्त हो म्हण

तू फक्त हो म्हण

1 min
14.9K


अगं तुझ्यासाठी मी काय नाही केलं?

खोटं बोललो, स्वकीयांना फसवलं 

धर्मांतर केलं, वेषांतर केलं ..

एवढंच काय झेंडे बदलले पक्षांतरही केलं 

 तू फक्त हो म्हण, तुझ्यासाठी काय पण

वाट्टेल त्या थापा मारल्या, भ्रामक आश्वासने दिले 

तुझ्यासाठी काय - काय करू म्हणजे तू भेटशील ?

तुझ्यापायी बायको पोराबाळांना वाऱ्यावर सोडलं ...

समाजकारणातून राजकारणाचं गाजर दाखवलं ...

तू फक्त हो म्हण, तुझ्यासाठी काय पण ... 

येतेस, जातेस आपल्या मर्जीने,तू आहेस तरी कोण?

रात्रंदिनी तुझेच भास, एवढं मात्र नक्की तू माझ्यासाठी आहेसच खास 

तिझ्यापायी मी कसा पार वेडा झालो, भ्रमिष्ट, कधी हवालदिल झालो&

nbsp;

किती खटपटी केल्या, उपद्व्याप केले तरीही तू भेटलीच नाही 

 तू फक्त हो म्हण, तुझ्यासाठी काय पण

थोर तुझी ग माया ,थोर तुझी छाया अशी कशी ग तू ? 

तू असताना - नसताना असतो मात्र नुसता जीवाला घोर

मीच काय तुझ्यासाठी सर जग महात्म्य तुझं थोर  

तू काहीही म्हण तुझ्या कर्तृत्वाला लाख लाख सलाम

 तू फक्त हो म्हण, तुझ्यासाठी काय पण ... 

विचार कसला करताय मित्रानो तुम्हीही तिचेच गुलाम 

सत्ता म्हणा , खुर्ची म्हणा नाहीतर म्हणा संगदिल सनम 

तरीही तुझेच भास, तूच खास, तुझ्यावरच विश्वास 

किती पिढ्या बरबाद झाल्या, किती जण वाया गेले

तू फक्त हो म्हण, तुझ्यासाठी काय पण ... 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy