STORYMIRROR

Mahesh Raikhelkar

Comedy

4  

Mahesh Raikhelkar

Comedy

"कवितेचा छंद आणी बायकोशी वाद

"कवितेचा छंद आणी बायकोशी वाद

1 min
885

एके दिवशी बायको म्हणाली

नका तुम्ही कवितेच्या छंदात पडू

हे ऐकून मला आलं कि हो रडू !!

मी हि मग रागातच म्हणालो ठीकंय ....तर मग ऐक

रिकामा वेळ असेल तेव्हा सिगरेट ओढत बसतो !

नाहीतर फावल्या वेळेत तंबाखु-गुटका मी खातो !

 जेव्हा निवांत असेल तेव्हा दारू ढोसत बसतो !

नाहीतर नुसत्याच मग चिकाटया मारत बसतो !

मोकळ्या वेळेत उगीचच कशाची तरी चिंता करतो  !

नाहीतर जुगाराच्या नादी  लागून पैसे मी हारतो !

वेळ घालवण्यासाठी मित्रासोबत पार्ट्या झोडतो !

बघ टुकार सिनमे पाहण्यात मग वेळ माझा  घालवतो !

मोबाईल वरील गेम खेळून चष्माचा नंबर वाढवतो !

ऐक शेवटी  नाहीतर मग तमाशालाच जावून बसतो !

हे सर्व ऐकून बायको गेली कि हो  घाबरून

आणि म्हणाली अगदी ती  काकुळतीला येवून

ऐका माझं भलतंच काही नका तुम्ही हो करू

त्या पेक्षा राहू द्या तुमचा कवितेचा छंद सुरु !

कवितेचा छंद सुरु !!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Comedy