STORYMIRROR

गौरव डवरे

Comedy Others

3  

गौरव डवरे

Comedy Others

मित्रांले माया लयच घाई....

मित्रांले माया लयच घाई....

1 min
234

मित्राचा सकाळी मेसेज आला..... 

शुभ सकाळ वाचत मी डिलीट केला.

नंतर पुन्हा मेसेज आला...... 

काय करतोय म्हणत पळत सुटला?  


सांगत सुटलो 'मी आणि ती' 

हाय सोबत अन करतोय गोष्टी. 

मित्राला माया संशय आला.....

त्याने अफवांचा बोलबाला केला. 


आता मात्र कमाल झाली.... 

मित्रांचे आले कॉल खाली. 


मित्र म्हणाले...... 

"गुरु ले लेका पटली पोट्टी 

आपण रायलो उपाशी पोटी 

वहिनी च नाव सांगणं बे लवकर 

आम्ही टाकतो तिच्या बहिणीवर मंतर" 


मैत्रिणीचा शेवटी कॉल आला.... 

तिने शिव्याचा पाढा चढवला 

"मी नंबर लावला तुयावर..... 

अन तू आणली मायी सवत भराभर".


नावाची मागणी होऊ लागली लयी.... 

मित्रानंले माया लईच घाई 

नाव सांगाले मी झालो तत्पर.... 

 मित्र म्हणाले घे उखाणा लवकर 


आता उखाणा पाठ केला... 

कसा बसा लवकर पाढा संपवला 


मित्रा म्हणाले..... 

"उखाणा लवकर घे न बे जाड्या 

 बहिणीवर मंतर मारायला

आम्ही काढल्याय गाड्या". 


उखाणा : "आलू ची केली भाजी 

       अन मुंगा चा केला वडा ll2ll

       लेखणी(pen) च माया नाव घेतो 

       मी तिचा येडा."


हे ऐकून माया मित्रानं 

लावल्या गाड्या दणादण 

अन् झोडपल मले भनाभन.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy