STORYMIRROR

Murari Deshpande

Inspirational Comedy

3.9  

Murari Deshpande

Inspirational Comedy

पुन्हा एकदा उलटून टाकू

पुन्हा एकदा उलटून टाकू

1 min
42.1K


पुन्हा एकदा उलटून टाकू 

वर्षाचे शेवटचे पान 

पुन्हा ठरवू या काही मनाशी 

जे जे राहून गेले छान 

झरझर जाती सरून वर्षे 

हातात उरती आठवणी 

निसटून गेले चकवा देऊन 

मनात भरपूर साठवूनी

गेलेल्या दिवसांची भाषा 

आज उमजते उशीरा फार 

कशास त्रागा मस्त वाहू दे 

आनंदाने जीवनधार 

हेही मिळते तेही मिळते 

असे नशीब का सगळ्यांचे 

भिन्नच असते आकाश मित्रा 

गरुड आणखी बगळ्यांचे 

खंत बाळगून संत होईना 

पंथ आपला मस्तीखोर 

चौकटीत मी जगतो माझ्या 

नाक मुरडू दे लहान थोर 

आवडली तर म्हणतो तिजला 

सौंदर्याची तू तर खाण 

उलटून गेले वयही माझे 

नकोस सोडू इकडे बाण 

तिखटासोबत आंबट गोडही 

मस्त पचविले जीवनभर 

जाओ बदलो वर्ष पुन्हा हे 

नसे कुणाच्या बापाची डर !


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational