हटाओ चायना मेड!
हटाओ चायना मेड!


आमच्याशिवाय भारताचे
पान म्हणे हलणार नाही
चीनला धडा शिकवताना
हयगय करून चालणार नाही
संपवायला कपटी चीनचा
विकृत जीवघेणा खेळ
हीच आहे शंभर टक्के
अगदी योग्य वेळ
आपल्या खिशातील पैसा
चीनला मुळीच मिळू नये
पुन्हा त्याची वाकडी नजर
आपल्याकडे वळू नये
सगळे मिळून चीनचे
करूया गर्वहरण
नाक मुठीत धरून
आलाच पाहिजे शरण
मनामनाला देशभक्तीचे
लागावे अफाट वेड
निर्धाराने मोहीम राबवू
हटाओ चायना मेड!