सोनेरी पहाट
सोनेरी पहाट
1 min
306
उन्हातून ऊन उगवली
नव्याने पाहत उजळली
रोपाला नवी पाने फुटली
आज मला नवी दिशा मिळाली.....
पक्षाचे थवे किलबिल करती
आकाशात नवा रंग पसरती
फुलांना नवा बहर येती
आज मला नवी दिशा मिळाली......
वाऱ्याने नवा गंध पसरला
पाण्याला नवा रंग मिळाला
पानांवर नवा बहर पसरला
आज मला नवी दिशा मिळाली......
चिमण्या नवी गाणी गाती
सोनेरी पहाट उजळून येती
फळांनी झाडें भरुनी जाती
आज मला नवी दिशा मिळाली.
