STORYMIRROR

गौरव डवरे

Others

3  

गौरव डवरे

Others

काही सुचतच नाही.

काही सुचतच नाही.

1 min
223

नाही सुचली आज एकही कविता..... 

मनात न्हवते शब्द न काही रुचता.

 

लिहायच होत्या मला.... 

ओळी मात्र भरपूर 

पण....... 

शब्दांनाच न्हवता.... 

आज माझ्या अर्थाचा पूर.

 

ढगाच्या वेलीना आज.... 

चिडवत होते पक्षी 

माझ्या मात्र मनात न्हवती..... 

शब्दांची कोणतीच स्तुती.


यमक नाही आज सापडे....

आहे सगळे शब्दांचे तूटवडे 

काय करू नि कुठे जाऊ..... 

मन नाही घरात राहू.  


काय असं आजच वाटे....

रहस्य हे ओळीचे साठे

डोळ्यात अश्रू आहे मोठे.... 

लेखणी मात्र वाटच पाहते.

  

नदी काठी जाऊन बसलो.... 

पाण्यात शब्द शोधत रमलो 

पण..... 

आज मला सुचतच नाही...... 

पापण्या मात्र शोधत राही.


पक्षी मात्र किलबिल करती..... 

शब्दांचा नवा धूळ उडवती 

मी फक्त पहात राही.....

आज मला काही सुचतच नाही.  


का असा मी गुमसत बसलो.... 

ओळीवर असा मी का आज रुसलो 

मनात शब्द येत नाही...... 

लेखणी मात्र वाटच पाही 

लेखणी मात्र वाटच पाही ✒️😔😔


Rate this content
Log in