"इश्काला आलाया पूर.."
"इश्काला आलाया पूर.."


तो :-
तुला पाहून राणी समुर..
भरून आलय माझं उर..
जीवा लागलीया हूर हुर..
झाल तनमन हे आतुर..
मनी दाटलयग काहूर..
नको राहू सखे आता दूर..
आज इश्काला आलाया पूर,
सांग मारू का मधी मी सुर..
ती :-
गडी आला मोठा बहाद्दूर..
दिसायला तू म्हैसासुर..
सांडा सारखा वाढला भेसूर..
घासू नग उगीच तू खुर..
नग पाहूस असं घुर घुर..
कानाखाली काढीन मी धूर..
नग इश्कात माझ्या तू पडुर..
वाहून जाशील तू दूर दूर..
तो :-
नार रेखीव तू चंद्रकोर..
नक्षीदार हिरा कोहिनूर..
ओठ अंजिर गाल अंगुर..
ज्वानी तुझी चिंच चिगुर..
पाया मधी वाजे ग्वाड नुपूर..
असा गावला धुंद सुर..
आज इश्काला आलाया पूर,
सांग मारू का मधी मी सुर..
ती :-
थोबाड तुझ काळ..भुर..
दिसतय कसं पेंड खजूर..
तुला बघुन भितील पोर..
हट बाजूला..तू लंगुर.
.
नग बघुस टुकुर टूकुर..
व्हय बाजूला फोडीन टकुर..
नग इश्कात माझ्या तू पडुर..
वाहून जाशील तू दूर दूर..
तो :-
लावू नग तू मला वाकुर..
जीव जडला मवा खोलवूर..
वाट पाहू तुझी कुठवूर..
जरा बघ ना फिरून साजुर..
भाळी लावूनी लाल सिंदुर..
तुला बनवीन माझी.. हूर..
आज इश्काला आलाया पूर,
सांग मारू का मधी मी सुर..
ती :-
तुझ प्रेम भारी लई बावर..
बघ झाले लाजून मी चूर..
आलं अंगावर कुंद शहार..
झाल काळीज माझ चुर..
भरल अंगात माझ्या कापूर..
आत पेटला अंगार दुर दुर..
आज इश्काला आलाया पूर..
मार लवकर आता तू सुर..
तो :-
कसू रान जोडीनं भरपूर..
घालू फाळ न् चालवू नांगुर..
रुजल बियाण फुलल अंकुर..
पिकल धान लै टपुर टपुर..
संग उगल छान हिरवी तूर..
दोघं मिळून गाठु प्रेमपुर..
आज इश्काला आलाया पूर..
चल जोडीनं मारु या सूर..