STORYMIRROR

Ganesh G Shivlad

Others

3  

Ganesh G Shivlad

Others

श्वास

श्वास

1 min
12

जन्मास आल्यावर येथे, घेतलेला पहिला श्वास तो,

निरोप जगास देतानाचा, सोडलेला शेवट श्वास तो,

दोघां मधले जे आहे अंतर, आहे जीवन प्रवास तो…


पहिला आणि शेवटचा, दोन्ही श्वास ते बहु खास,

आनंद होय पहिल्यास, तर शेवटचा काही उदास,

दोघां मधला जो प्रवास आहे, भास अन् अभास तो…


जगावे कसे आणि निरोपावे, कळले जर का हे गणित,

होऊन जाईल श्र्वासोश्वासांचे, सुगम सुमधुर संगीत,

जरी भासे भकास जीवन, परी जगण्याचा हव्यास तो…


श्वास आहे दीर्घ अंतरा, अत: पासून इति पर्यंत,

अंतर नको देऊ त्याला, ठेव टिकवून दीर्घ अंतापर्यंत,

आयुष्याच्या संध्ये शेवटी, हवाहवासाच सहवास तो…



Rate this content
Log in